आम्ही सैराट सारखे पळून आलो असे शेजाऱ्यांना वाटे - डॉ. लार्किन्स रामटेके
X
सावित्रिमाई यानी सुमारे पाऊणे दोनशे वर्षापूर्वी स्त्रीआणि दलितांच्या शिक्षणासाठी सवर्ण समाजाचे शिव्या-शाप, शेणगोळे, दगड गोटे सहन केले, धर्म-बुडवी अशी दूषणं ज्या सावित्रीमाई यांना देण्यात आली त्या सावित्रीमाई व ज्योतिराव फुले यांच्या या अलौकिक कार्यामुळेच आज महिला आणि मुली अनेक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत.
लार्किन्स रामटेके यांची कहाणी :
लार्किन्स रामटेके ही अशीच एक तरुणी. लार्किन्स पक्षाप्रमाणे लार्किन्स हिने विज्ञानाच्या क्षेत्रात उंच अशी भरारी घेतली आहे. आज लार्किन्स हिने केलेल्या संशोधनाचा येणाऱ्या काळात जगाला फायदा होणार आहे.गंभीररित्या भाजलेल्या अथवा जळालेल्या रूग्णांना तातडीने उपचार मिळणं गरजेचं असतं. रूग्ण उपचारांच्या सुरुवातीच्या शरीरात होणाऱ्या विविध बदलांचे योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
त्वचेचे आवरण नष्ट झाल्यामुळे खालील थरामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण निर्जंतुक अशा भाजलेल्या व्यक्तीच्या जखमा भरून येणं ही अतिशय संथ प्रक्रिया आहे.मात्र आपण यासाठी घरचे उपाय किंवा तत्काळ काय करू शकतो हे माहीत असणे गरजेचे आहे.
लार्किन्स रामटेके या आज वैज्ञानिक असून त्यांनी भाजलेल्या व्यक्तीला होणाऱ्या जंतू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या संशोधनातून उपाय शोधून काढला आहे कारण भाजलेली व्यक्ती ही भाजण्याऐवजी तिला होणाऱ्या जंतू प्रादुर्भावाने मरण पावण्याचे प्रमाण 70% आहे. याशिवाय प्लास्टिक, शीतपेयाचे कॅन, प्लास्टिक-अल्युमिनियम रॅपर यांना नष्ट करून त्यापासून विमानाचे इंधन तैयार करण्याची पद्धती त्यांनी शोधून काढली आहेत.
लार्किन्स कडे आता तीन पेटंट आहेत. समाजाचा भाजलेल्या रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. त्यामुळेच या रुग्णांना शात्रोक्त उपचारांव्यतिरिक्त मानसिक आधाराची गरज असते हे नातेवाईकांनी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्तणूक ठेवणं अपेक्षित असतं. रुग्णाच्या समस्यांची मालिका अगदी त्याला हॉस्पटिलमध्ये दाखल करण्यापासून सुरु होते. आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांचा हा रिपोर्ट