Home > रिपोर्ट > सुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांनी केला गौप्यस्फोट

सुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांनी केला गौप्यस्फोट

सुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांनी केला गौप्यस्फोट
X

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी त्यांच्या कुटुंबाविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविरोधात मोठा खुलासा केला आहे. त्यांत्या सुनेने दुसऱ्यांदाही मुलीला जन्म दिल्याप्रकरणी तीचा छळ केला जात असल्याची तक्रार विलेपार्ले पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या आरोपांचं खडन करत विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबंध अल्यामुळे तीने हा प्रकार केल्याचं म्हटलंय.

संबंधित बातमी..

राष्ट्रवादी आमदार विद्या चव्हाणांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकणी गुन्हा दाखल

विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. “सूनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलाने यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता,” अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/494442078131601/?t=1

“नवरा बायकोच्या वादात मला भोवण्यात आलं. दुसरी मुलगी झाली म्हणून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही दुसऱ्या मुलीलाही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. कायदा दुधारी शस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. परंतु कोणी त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गानं हा लढा सुरूच राहिल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Updated : 3 March 2020 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top