Home > रिपोर्ट > कल्पिता पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का?

कल्पिता पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का?

कल्पिता पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का?
X

राष्ट्रवादी पक्षाचे अनेक दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवीन तरूणांना अधिका अधिक संधी देण्याचं जाहीर केलं आहे. तेव्हापासून अनेक नवीन चेहऱ्यांच्या मनात उमेदवारी साठी अंकूर फुटले आहेत. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे जळगाव ग्रामीण मधून उमेदवारीची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी देखील कल्पिता पाटील यांच्या उमेदवारीला होकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाकडून जळगाव ग्रामीण मतदार संघात कल्पिता पाटील रिंगणात उतरणार हे स्पष्ट झालं आहे.

जळगाव ग्रामीणमध्ये सध्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी आव्हान दिल्याचं बोललं जातं. परंतू देवकर हे घरकुल घोटाळ्यात दोषी ठरल्यामुळे त्यांचं नाव मागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक ईच्छूकांनी गर्दी जमवली होती. त्यात आता कल्पिता पाटील यांनी उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी देखील पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.

Updated : 24 Sep 2019 3:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top