पंकजांनी मागितले मतदान न होणाऱ्या बूथची यादी- धनंजय मुंडेंचा आरोप
Max Woman | 21 May 2019 11:22 AM IST
X
X
भाजपा नेते बिडचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ईव्हीएम मशिन हँकींग केल्याचा व भाजपाला मतदान न बोणाऱ्या बुथच्या याद्या मागवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
“तुम्ही माध्यमांसमोर येण्याआधी बीडमधून मला अशी माहिती मिळाली की, तिथले पालकमंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारत आहेत की, जिथे भारतीय जनता पार्टीला परंपरागत मतदान मिळत नाही, त्या बूथची यादी द्या. ती यादी कशासाठी? ज्या गावामध्ये भाजपला मतदान मिळत नाहीत, त्या बूथ क्रमांकाची यादी तुम्हाला कशाला पाहिजे? आज तीन दिवसांवर मतमोजणी आलीय. हे एकट्या बीडमध्येच नाही. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने चालू आहे. ईव्हीएम हॅकिंगचा पुन्हा काही प्रयत्न चालू आहे का? ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात काही विषय चालू आहे का?” असं माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. विधानपरिषद धनंजय मुंढे राष्ट्रवादीत तर पंकजा मुंढे भाजपामध्ये आहे , हे दोघेही चुलत भाऊ-बहीन आहेत. त्याचबरोबर बिडचे राजकारण मुंढे कुंटूंबावशिवाय पुर्ण होऊच शकत नाही.
Updated : 21 May 2019 11:22 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire