Home > रिपोर्ट > राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराचा अर्ज बाद

राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराचा अर्ज बाद

राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराचा अर्ज बाद
X

एबी(AB Form) फॉर्म नाही, सही न करता अर्ज कोरा ठेवणं इत्यादी कारणांमूळे उमेदवारीचा अर्ज बाद होत असतो. मात्र पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत-धर (Sulakshana Shilwant-Dhar) यांचा अर्ज वेगळ्याचं कारणामुळे बाद झाला आहे.

राष्ट्रवादीने आपल्या दुसऱ्या यादीत पिंपरी चिंचवड राखीव मतदार संघातून सुलक्षणा धर यांना उमेदवारी दिली होती. ऐनवेळी पक्षाने उमेदवार बदलून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली. आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि चपळाईने बनसोडे यांनी उमेदवारीचा अर्ज सकाळी 11 वाजता दाखल केला होता.

तर शक्तीप्रदर्शनाच्या मिरवणूकीमुळे सुलक्षणा धर यांनी त्यांचा अर्ज 1 वाजता दिला. एका पक्षातून एक उमेदवार असा नियम असल्यानं बनसोडे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. मात्र, सुलक्षणा धर यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे निवडणूकीच्या रिंगणात याची मोठी चर्चा सुरू आहे.

Updated : 6 Oct 2019 9:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top