Home > रिपोर्ट > महिलांसाठी कुसुम महोत्सवा तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम

महिलांसाठी कुसुम महोत्सवा तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम

महिलांसाठी कुसुम महोत्सवा तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम
X

आज भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम कुसुम महोत्सवाकडून घेतले जातात.

यावेळी देखील स्व.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी आमदार अमिता अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या कुसुम महोत्सवाचे आयोजन केले असून यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुलींच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे या महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. दरम्यान २६ जानेवारीपासून सुरू झालेला हा महोत्सव १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

कुसुम महोत्सवामध्ये अनेक शैक्षणिक, क्रीडा, प्रशिक्षणपर, प्रबोधनपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

Updated : 26 Jan 2020 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top