Home > रिपोर्ट > मुलीला मिळणार आईची जात

मुलीला मिळणार आईची जात

मुलीला मिळणार आईची जात
X

मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

अनेक महत्वाच्या प्रवेश प्रक्रियेत जात प्रमाणपत्र सादर करावी लागतात मात्र ज्या कुटुंबात महिला विभक्त झालेली असते किंवा अंतरजातीय विवाह झालेले असतात अश्या परिस्थितीत मुलीला आईची जात नाकारली जावू शकत नाही.

काय आहे प्रकरण

नुपूर भागवत हिने आईच्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी याचिका दाखल केली होती. नुपूरची आई हलबा जातीची असून, त्यांनी आंतरजातीय विवाह झाला होता. विवाहानंतर एक वर्षाने नुपूरचा जन्म झाला. दरम्यान, नुपूरची आई पतीपासून विभक्त झाली. तेव्हापासून त्या नुपूरसह वेगळ्या राहात आहेत.

नुपूरने हलबा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आईच्या कागदपत्रांसह अमरावतीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता, परंतु वडिलांची कागदपत्रे सादर केली नाहीत, असे कारण देऊन तिचा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्याविरुद्ध तिने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील केले. समितीनेही तिला दिलासा नाकारला व उपविभागीय अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने नुपूरची बाजू योग्य ठरविली आणि उपविभागीय अधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आदेश रद्द केले. नुपूरच्या अर्जावर कायद्यानुसार विचार करून तिला आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. अशा प्रकरणांमध्ये आईची कागदपत्रे स्वीकारून अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदविले.

Updated : 9 July 2019 8:57 AM GMT
Next Story
Share it
Top