Home > रिपोर्ट > माझी लढाई गोपीनाथ मुंडे हे नाव जपण्यासाठी आहे- पंकजा मुंडे

माझी लढाई गोपीनाथ मुंडे हे नाव जपण्यासाठी आहे- पंकजा मुंडे

माझी लढाई गोपीनाथ मुंडे हे नाव जपण्यासाठी आहे- पंकजा मुंडे
X

महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ‘बारामती मध्ये असणारी मंडळी दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे नाव पुसायला निघाली आहेत. परंतू बीड मधील जनतेने मुंडे साहेबांवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम दिले आहे. कितीही प्रयत्न केला तरी ते पुसले जाणार नाही’. असा विश्वास व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर तोफ डागली.

‘माझी लढाई ही फक्त एका व्यक्तीशी नसून वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. माझे विरोधक स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. पण मी मात्र तुमच्या सेवेसाठी लढत आहे. तुम्ही मला मतदारसंघाची पहिली आमदार केले होते. आता नामदार करण्यासाठी एक महिना माझ्यासाठी द्या. मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यानंतर साहेबांवर प्रेम करणा-यांमध्ये अनाथ झाल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र, माझ्या मनावर दुःखाचा प्रचंड डोंगर असताना साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना आधार देण्यासाठी मी राजकारणात सक्रिय राहून साहेबांची जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. माझी लढाई सर्वसामान्यांचे हित व गोपीनाथ मुंडे हे नाव जपण्यासाठी आहे’. अशी भावनीक साद पंकजा मुंडे यांनी परळी करांना घातली आहे.

Updated : 25 Sep 2019 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top