Home > Max Woman Blog > मुस्लीम मुली आणि CAA विरोध!

मुस्लीम मुली आणि CAA विरोध!

मुस्लीम मुली आणि CAA विरोध!
X

देशाच्या विविध धर्मातील मुलींचा विचार केला तर मुस्लिम स्त्री अजूनही अंशतः पडद्यात धर्मात,आणि पारिवारीक विवाहात अडकलेली आहे. मात्र अलीकडे अश्या काही घटना घडून आल्या आहेत त्यामध्ये मुस्लिम महिला,मुलींची संख्या लक्षणीय अग्रगण्य पाहायला मिळाली . ती घटना म्हणजे CAA आणि NRC विरोधात रस्त्यावर उतरलेल्या या महिला. या लढ्यात मुस्लिम महिलांवर असलेल्या रूढी परंपरा चिरडल्या गेल्या. मुळात मुस्लिम धर्मात स्त्रियांना अनेक धार्मिक आणि सामाजिक जाचक अटी आहेत.

Jamia Millia Islamia

गैर पराय पुरुषाची सावली पडणे पण गुन्हा आहे. मात्र या घटनेत या प्रथा सर्व धुळीला मिळाल्या आणि एक नवीन हिजाबातील मुस्लिम स्त्रीचा चेहरा कधी का नव्हे यानिमित्ताने हिजाबामधून बाहेर आला. या आंदोलनाचा एक वैशिष्ट आहे की जेवढ्या संख्येने मुस्लिम पुरुष दिसले नाही त्याच्या जास्त पटीने मुस्लिम स्त्रिया फक्त दिसल्या नाहीत तर जो बुरख्यामागील जो रोष आहे तो बाहेर आला. आणि हा नोंदणीय आहे. कारण याआधी असा इतिहास मुस्लिम स्त्रियांच्या बाबतीत दावलेला नाही. याची दखल घेतली जाईल आणि मुस्लिम कट्टरतावादाला एक बुरखा चपराक आहे असं म्हणणं अलंकारिक होणार नाही. देशातील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया ही दोन प्रमुख केंद्र होती. आणि या मोर्चाकडे पाहिले तर सर्व नेतृत्व्य हिजाबी दाखवणारे होते.

Related image

पुरुष नेतृत्व्य या मुलींनी बहुतेक स्वीकारलं नसावं. आणि जर स्वीकारलं असतं तर त्याला मर्यादा आल्या असत्या. ते बरं होतं की यामध्ये पुरुषी चेहरा नव्हता . या आंदोलनात एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लीम महिला एकत्र येणे ही पहिलीच वेळ असावी. यामध्ये प्रामुख्याने एका दिल्लीमधल्या जागेची नोंद घेणे गरजेचं आहे ते म्हणजे शाहीन बाग या बागेत गेले २८ -३० दिवस त्याच प्रकर्षाने आंदोलने होत आहेत. मुळात हा परिसर गरीब मुस्लिमबहुल वस्तीतला मात्र लढा अजूनही सुरु राहणार आहे असं त्यांच्या आवेशाने दिसत आहे. जर हाच आवेश तसाच पुढे राहिला तर यापुढे चित्र वेगळं असेल. कारण धर्मापेक्षा (वालिद) पिता यांच्या मर्यादेत राहावं लागतं आणि नंतर (शौहर) पती यांच्या चौकटीत मात्र ही चौकट आता भेदलेली आहे.

Related image

हे सर्व जामिया मिलिया इस्लामियावर झालेल्या हल्ल्यानंतर पाहायला मिळालं. याचबरोबर अलीगड मुस्लीम विद्यापीठामध्ये देखील मुलींच्या हॉस्टेलमध्ये काही तरुणींना हॉस्टेलच्या आत बंद करून ठेवलेले होते. मात्र हा आक्रोश बंद राहण्यातला नव्हता अखेर तो बाहेर रस्त्यावर आला. अनेक मुलींना या हिंसाचारानंतर घरी पाठवण्यात आले मात्र यामध्ये २० वर्षाची आयशाआणि २१ वर्षाची तुबा या दोन तरुणी घरातून पुन्हा विद्यापीठात या आंदोलनात सहभागी झाल्या. यांचे फोटो,व्हिडिओ माध्यमांमध्ये वायरल झाले.

या आंदोलनातून मुस्लीम महिलांना स्वतःचा दबलेला आवाज अनेक लोकांनी ऐकला. त्यामुळे बुरखा आणि हिजाब हे पुढील आंदोलनाचे प्रतीक असेल. या जाणिवेची ठिणगी प्रथम तिहेरी तलाक आणि बाबरी मशीद आणि याआधी (शाहबानो प्रकरण) आणि (गोध्रा हत्याकांड) ईथून झाली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि हा आक्रोश येणाऱ्या अनेक मुस्लिम मुलींना नवीन आरसा दाखवणार ठरेल.

-तेजस बोरघरे

Updated : 12 Jan 2020 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top