Home > रिपोर्ट > मुमताज सुखरुप! सोशल मीडियावर निधनाच्या केवळ अफवा

मुमताज सुखरुप! सोशल मीडियावर निधनाच्या केवळ अफवा

मुमताज सुखरुप! सोशल मीडियावर निधनाच्या केवळ अफवा
X

सध्या सोशल मीडिया वर अनेक दिग्गज व्यक्तींच्या मृत्यूच्या पोस्ट व्हायरल होत असतात. या व्हायरल पोस्टमधील बहुतांश पोस्ट अफवा असतात. अशीच एक अफवा काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत होती. ती पोस्ट म्हणजे ६० ते ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांचं निधन......

मुंबईतील एका रुग्णालयात मुमताज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं ट्विट पत्रकार आणि चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी केलं होतं. नंतर नाहटा यांनीही मुमताज यांच्या निधनाविषयी चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागितली आहे.

शेवटी ही बातमी खोटी असल्याचं दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी स्पष्ट केलं आहे. मुमताज यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी ट्विटर द्वारे सांगितलं आहे. स्वतः मुमताज यांनीसुद्धा एका वृत्तवाहिनीला आपण सुखरूप असल्याचे सांगितले आहे. मुमताज सध्या लंडनमध्ये असून त्यांची प्रकृतीही ठणठणीत आहे.

‘मी सध्या लंडनमधल्या घरी असून इथे मी मजेत आहे. माझ्या निधनाच्या अफवांमुळे माझे चाहते निराश होत असतील. मलाही स्वत:विषयीच्या अशा चर्चा ऐकून वाईट वाटतं,’ असं त्या म्हणाल्या.

Updated : 4 May 2019 8:50 AM GMT
Next Story
Share it
Top