‘नाइट लाइफ’ चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना "हा" सवाल
X
महाविकास आघाडीतील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाइट लाइफ’ची चर्चा सध्या सुरु आहे. महाविकास आघाडीतील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना मांडून येत्या प्रजासत्ताक दिनापासून मुंबईत नाईट लाईफ सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 2016 मध्ये यासंबंधीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मान्यता दिली होती. मात्र आता या मुद्द्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एका घटनेचा दाखला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारलं आहे. "मुंबईतं कुर्ला- LTT रोडवर रेल्वेस्टेशनला जाताना महिलेवर सामूहिक बलात्कार झालायं मुंबईतं महिला मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं असतांना”नाईट लाईफ’ मुंबईत सुरु करण्यास प्राधान्य देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिला सुरक्षेला कधी प्राधान्य देणार ?? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.