Home > रिपोर्ट > आम्हाला काटकसरीने संसार करता येतो - सुप्रिया सुळे

आम्हाला काटकसरीने संसार करता येतो - सुप्रिया सुळे

आम्हाला  काटकसरीने संसार करता येतो  - सुप्रिया सुळे
X

राजमाता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी अनेक राजयकीय नेते सिंदखेडराजा येथे आले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे पोहचल्या होत्या.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती मिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंदखेडराजा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपला चांगलच धारेवर धरलं. “गेल्या पाच वर्षात भाजपने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा परिस्थितीत काम करणं अवघड असले तरिही यातून मार्ग काढून हे सरकार यशस्वीरित्या काम करेल.” तसच राज्यावर असलेल्या कर्जाची माहिती जनतेला होऊ द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याच खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://youtu.be/1Oa5wraxULw

Updated : 12 Jan 2020 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top