Home > रिपोर्ट > मिसेस मुख्यमंत्र्यांनी केली फडणवीसांची पाठराखण

मिसेस मुख्यमंत्र्यांनी केली फडणवीसांची पाठराखण

मिसेस मुख्यमंत्र्यांनी केली फडणवीसांची पाठराखण
X

राज्यात मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे.

“मुख्यमंत्र्यांनी १०० नाही तर, २०० टक्के देऊन काम केलं आहे. फडणवीस यांच्याएवढं काम न भूतो न भविष्य कोणीही करू शकत नाही. त्यांच्या एवढं न्याय देण्याचं काम कोणीही करू शकत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजप सक्षम आहे.” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या संघर्षावर बोलताना त्यांनी, “भाजपाशी जुळवून घ्या असं आवाहन मी शिवसेनेला करु शकत नाही. त्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. ते माझं ऐकणारही नाहीत,” असं मत पुण्यातील खासगी कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

Updated : 8 Nov 2019 2:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top