‘या’ महिला खासदाराच्या नृत्याचा व्हिडीओ झाला व्हायरल
Max Woman | 21 Sept 2019 7:45 PM IST
X
X
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्य आपली संस्कृती जपत असतं. जसं महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसंच पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी दुर्गापूजा मोठ्या थाटात आणि जल्लोशात साजरी केली जाते. हे दुर्गा पुजा सुरू होण्यासाठी बरेच दिवस असले तरी, बंगाली अभिनेत्री म्हणजेच सध्याची तृणमुल कॉंग्रेस खासदार नुसरत जहा आणि मीमी चक्रवर्ती यांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये दोघीही पुजेसाठी तयार करण्यात आलेल्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
4 ते 8 ऑक्टोबर च्या दरम्यान साजरा होणाऱ्या दुर्गापुजेसाठी या गाण्याच्या माध्यमातूम एका मोहिमेचं प्रसारण करण्याचं योजले असून सध्या हे गाणं सोशल मिडीयावर चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. ‘असे मॉं दुर्गा शे’ असे गाण्याचे बोल आहेत. हे गाणं खास दुर्गापूजेसाठी तयार करण्यात आलं आहे.
Updated : 21 Sept 2019 7:45 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire