‘मातोश्री’त राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात सतत महिला अत्याचार
X
अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील ७ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याच्याराबाबत गृहमंत्र्यांना भेटणार असून आरोपीवर कडक कारवाई करून शिक्षेची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा (MP Navneet Kaur Rana) यांनी दिली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या ‘मातोश्री’ नावाच्या घरात राहतात, ज्या नावावर मोठे होतात, मुख्यमंत्री बनतात. त्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात गेल्या काही महिन्यापासून वारंवार महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत.”अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका सात वर्षीय मुलीला चॉकलेटच आमिष दाखवून ५५ वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना घडली होती. या घटनेस अनुसरुन असे कधीपर्यंत चालणार आणि दिशा कायदा कधी लागू होणार अशी विचारणा केली असून गुन्हेगारांना त्वरीत फाशी झाली पाहिजे अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिशा कायदा लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/674743069937337/?t=6