Home > रिपोर्ट > या राज्यांमध्ये सर्वाधिक महिला बेरोजगार....

या राज्यांमध्ये सर्वाधिक महिला बेरोजगार....

या राज्यांमध्ये सर्वाधिक महिला बेरोजगार....
X

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय त्यांच्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये देशातील 11 राज्यात सरासरी पेक्षा जास्त बेरोजगारी असल्याचं समोर आलं होतं. 2011 -12 मध्ये हरीयाणा, आसाम, झारखंड, केरळ, ओडिसा, उत्तराखंड आणि बिहार मध्ये बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त होता. परंतु आता 2017-18 मध्ये या यादीत पंजाब, तमिळनाडु, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही राज्य देखील जोडली गेली आहेत. NSSO च्या वार्षिक आकडेवारीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक महिला बेरोजगारी?

गुजरात नंतर बेरोजगारीचा दरात सगळ्यात अधिक मध्य प्रदेश (4.5 टक्के), उत्तर प्रदेश (6.4 टक्के ) आणि राजस्थान (5 टक्के) वाढ झाली. तर 2011-12 च्या तुलनेत ही सरासरी चार पटीने अधिक वाढ झाली आहे. मोठ्या राज्यांमध्ये बेरोजगारीचा दर सगळ्यात कमी होता. पश्चिम बंगाल च्या तुलनेत. 2011-12 मध्ये राज्यात बेरोजगारीचा दर 3.2 टक्के होता. जो 2017-18 मध्ये 4.6 टक्के झाला आहे. सहा वर्षा पूर्वी हे राज्य सगळ्यात जास्त बेरोजगारीच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर होते. जे 2017-18 मध्ये सगळ्यात कमी बेरोजगारी असलेल्या पाच राज्यांमध्ये समाविष्ट झाले आहे.

महिला-पुरुषांच्या आधारावर देशात बेरोजगारी चे आकलन केल्यानंतर खूप काही हाती लागले. दोनच राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये महिलां मधील बेरोजगारीचा दर कमी आढळला. 2011-12 मध्ये बिहारमध्ये महिलांमधील बेरोजगारीचा दर 8.8 टक्के होता आणि तो या वर्षांत सर्वाधिक असून महिला बेरोजगारीच्या बाबतीत दूसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. परंतु 2017-18 मध्ये यामध्ये घट होऊन 2.8 टक्के इतका झाला. तर पश्चिम बंगालमध्ये हा दर 3.6 टक्के होता यामध्ये घट होऊन 3.2 टक्के झाला.

केरळमध्ये 2017 – 18 मध्ये एक चौथाई (23.2 टक्के) महिला बेरोजगार होत्या. हा दर मोठ्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. 6 वर्षापुर्वी या राज्यातील महिलांचा बेरोजगारीचा दर 14.1 टक्के होता. तर आसाममध्ये 13 .9 टक्के, पंजाब 11.7 टक्के आणि हरियाणा 11.4 टक्के होता.

पुरुषांचा विचार करता पुरुषांमध्ये 2017-18 ला सर्वाधिक बेरोजगारीची दर झारखंड मध्ये दिसून आला. तो 8.2 टक्के राहिला आहे. जो 2011-12 च्या 2.4 टक्क्यांच्या तुलनेत तीन पटीने अधिक आहे. यानंतर हरियाणा (8.1 टक्के ), तमिळनाडू (7.8 टक्के ) आणि बिहार (7.4 टक्के ) इतका बरोजगारीचा दर आहे. 15 ते 29 वर्षांच्या वर्गांत केरळमध्ये महिला बेरोजगारीचा दर गंभीर स्तरावर पोहचला आहे. रोजगारच्या शोधात असलेल्या तीन-चौथाई (¾) तरुणांना 2017-18 मध्ये नोकरी मिळाली नाही.

पंजाबच्या ग्रामीण भागामध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी दर 2017-18 मध्ये 43.2 टक्के राहिला. जो की 2011-12 मध्ये 4.2 टक्के होता. आसाम (38.5 टक्के), हरियाणा (29.4 टक्के) आणि तमिळनाडू (26.7 टक्के) या राज्यातील गावांमधील तरुणांचा बेरोजगारीचा दर अपेक्षेपेक्षा अधिक राहिला. शिवाय बिहारच्या शहरी भागांमध्ये युवकांमध्ये बेरोजगारीचा दर 2017-18 मध्ये 38.2 टक्के राहिला. जो की 2011-12 मध्ये 43.4 टक्के होता.

Updated : 25 April 2019 11:04 AM GMT
Next Story
Share it
Top