Home > रिपोर्ट > आमदार यशोमती ठाकूर विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड

आमदार यशोमती ठाकूर विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड

आमदार यशोमती ठाकूर विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड
X

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यात या पदावर एकूण चार आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे . यामध्ये यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. संजय रायमुलकर, धर्मराम आत्राम, कालिदास कोळंबकर आणि यशोमती ठाकुर यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे.,विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अनुपस्थितीत हे नियुक्ती केलेले तालिका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांच्या आसनावर बसुन कामकाज चालू शकणार असल्यामुळे हा बहूमान यशोमती ठाकुर यांना मिळाला आहे.

Updated : 17 Dec 2019 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top