Home > रिपोर्ट > रश्मी बागल यांचा राष्ट्रवादीला रामराम

रश्मी बागल यांचा राष्ट्रवादीला रामराम

रश्मी बागल यांचा राष्ट्रवादीला रामराम
X

करमाळ्यात सोमवारी बागल गटाचा मेळावा पार यावेळी या मेळाव्यात बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या बुधवार २१ ऑगस्ट १२ वाजता मुंबई 'मातोश्री'येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस सोबत काम करत असताना सतत डावलले जात असल्याची भावना करमाळ्यातील बागल गटाच्या समर्थकांची आहे. रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तिथे दोन गट निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यांच्या प्रवेशामुळे करमाळ्यातील विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या गटात मात्र तीव्र नाराजी पसरली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना वेगळे लढूनही नारायण पाटील विजयी झाले होते. त्यामुळे मात्र, शिवसेनेने माझे तिकिट कापले तर शिवसैनिकांशी चर्चा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असा इशारा आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.

Updated : 20 Aug 2019 7:05 AM GMT
Next Story
Share it
Top