Home > रिपोर्ट > भाजपच्या शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची निवड

भाजपच्या शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची निवड

भाजपच्या शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची निवड
X

भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर शहर सरचिटणीसपदी गणेश बिडकर यांची निवड झाली आहे. मिसाळ पक्षाच्या पहिल्या महिला शहराध्यक्ष ठरल्या आहेत.योगेश गोगावले यांची सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान शहराध्यक्षपदी होते.

तर आता योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिसाळ या सन २००७ मध्ये नगरसेविका म्हणून महात्मा फुले मंडई या वॉर्डातून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आल्या आहेत.

Updated : 20 Aug 2019 6:46 AM GMT
Next Story
Share it
Top