Home > रिपोर्ट > मिताली राजने टी-20 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलींचा ‘हा’ विक्रम मोडला

मिताली राजने टी-20 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलींचा ‘हा’ विक्रम मोडला

मिताली राजने टी-20 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलींचा ‘हा’ विक्रम मोडला
X

जगामध्ये पुरुष क्रिकेटपेक्षा महिला क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं जातं. मात्र, महिला क्रिकेटपटू देखील कमी नाहीत हे भारतीय क्रिकेटपटू मिताली राजने दाखवून दिले आहे. सध्या वेस्टइंडिजमध्ये महिला टी 20 विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्तान आणि आयर्लंडवर शानदार विजय मिळवला.

मिताली राजने पाकिस्तान आणि आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात 17 अर्धशतक ठोकले. तर रोहित शर्माने 33.43 च्या सरासरीने 2207 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 62 टी -20 सामन्यात 48.88 च्या सरासरीने 2102 धावा केल्या आहेत. तर 35 वर्षीय मितालीने या वेळी टी -20 इंटरनेशनल मध्ये 37.42 च्या सरासरीने 2283 धावा करत रोहीत आणि विराटला आपल्या बॅटिंगच्या जोरावर मागे टाकत हम भी किसी से कम नहीं है, हे दाखवून दिले आहे.

Updated : 9 May 2019 6:59 AM GMT
Next Story
Share it
Top