Home > रिपोर्ट > #हिंगणघाट : मुलांना 'ना' ऐकण्याची गरज आहे – वर्षा गायकवाड

#हिंगणघाट : मुलांना 'ना' ऐकण्याची गरज आहे – वर्षा गायकवाड

#हिंगणघाट : मुलांना ना ऐकण्याची गरज आहे – वर्षा गायकवाड
X

हिंगणघाट, औरंगाबाद, मीरारोड येथील महिला अत्याचारांच्या घटनेनं महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या दोन दिवसात तीन महिलांना जीवंत जाळल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना मुलांना ना ऐकण्याची गरज आहे. मुली ह्या एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. हे समजून घेतलं पाहिजे. त्यांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार आहे. याचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय वर्षा गायकवाड यांनी?

वर्धा जिल्ह्यात एका तरुणीला जाळण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. महिलांनी नाही म्हटलं पाहिजे आणि पुरुषांनी ते स्वीकारलं पण पाहिजे. अशी मानसिकता समाजामध्ये निर्माण व्हायला हवी. महिलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांचं एक स्वत:चं मत आहे. या साठी प्रबोधनाची गरज आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे मुलांना ना ऐकण्याची गरज आहे. एकतर्फी प्रेमातून या घटना होतात. त्या खरंच दुर्दैवी आहेत. अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Updated : 5 Feb 2020 6:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top