Home > रिपोर्ट > भ्रष्ट नाना पाटेकरला दिली क्लीन चिट- तनुश्री दत्ता

भ्रष्ट नाना पाटेकरला दिली क्लीन चिट- तनुश्री दत्ता

भ्रष्ट नाना पाटेकरला दिली क्लीन चिट- तनुश्री दत्ता
X

#मीटू चळवळीला भारतात सक्रीय करणाऱ्या तनुश्री दत्ता हिच्या लैंगिक शोषण प्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली. त्यानंतर तनुश्रीने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

'भ्रष्ट पोलीस दल आणि न्यायव्यवस्थेने, त्याहीपेक्षा भ्रष्ट व्यक्ती असलेल्या नाना पाटेकर यांना क्लीन चिट दिली आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया तनुश्रीने व्यक्त केली आहे. नानांवर आणखीही अनेक महिलांनी धमकावल्याचा तसेच छळ केल्याचा आरोप केलेला आहे, असेही ती पुढे म्हणाली.

तनुश्रीच्या वकिलांनीही याप्रकरणी आपलं म्हणणं मांडलं असून पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर 'क्लोजर रिपोर्ट'ला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, २००९ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील आयटम सॉन्गच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने तक्रारीत केला होता. त्यातूनच 'मी टू' चळवळ उभी राहिली होती.

Updated : 14 Jun 2019 3:30 AM GMT
Next Story
Share it
Top