Home > News > 'आरोप सिद्ध करा, मी शिक्षा भोगेन' किरीट सोमय्यांना महापौरांचं खुलं आव्हान

'आरोप सिद्ध करा, मी शिक्षा भोगेन' किरीट सोमय्यांना महापौरांचं खुलं आव्हान

आरोप सिद्ध करा, मी शिक्षा भोगेन किरीट सोमय्यांना महापौरांचं खुलं आव्हान
X

महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर ‘तुम्ही आरोप सिध्द करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे.’ असं खुलं आव्हान महापौरांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे.

किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "बेताल वत्तव्यामुळे किरीट सोमय्या यांची खासदारकी गेलीय. मुळात त्यांच्याप्रमाणे आम्ही काहीही लाटलेलं नाही. माझं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान आहे. मी 2008 मध्ये तिथे भाड्याने राहत आहे. दरवर्षी ते भाडं मालकाला जातं, त्याचे सगळे पुरावे आहेत. किश कॉर्पोरेटचं ऑफिसही भाडेतत्त्वावरच घेतलेलं आहे. त्यामुळे लाटण्याचा प्रश्नच कुठे येतो? आमच्याकडे सगळे पेपर आहेत. माझं घर, वकील चाळ जी अजूनही डेव्हलप होतेय, कदाचित मे महिन्यात त्याचा ताबा मिळेल. तोपर्यंत आम्ही भाड्याने राहतोय आणि दरवर्षी पाच टक्क्यांनी मालकाला वाढवून भाडं देतोय. मी सामान घेऊन कुठे फिरु. तुम्ही आरोप सिद्ध करा. सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगेन. किरीट सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करत आहेत."

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी या विरोधात मुंबई महापालिकेबाहेर आंदोलन केलं. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Updated : 29 Sep 2020 6:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top