Home > रिपोर्ट > आसमॉं के पार शायद..

आसमॉं के पार शायद..

आसमॉं के पार शायद..
X

लेह लडाखबद्दल आणि तिथे जाऊन लोक दुचाकीवरुन सफर करतात हे मी वाचलं होतं, ऐकलं होतं. दूरच्या ओळखीतलं, माहितीतलं कधीतरी कुणीतरी गेलं, जातं असं काहीतरी कानावर आलं होतं. तो प्रदेश सुंदर आहे हेही ऐकलं होतं, प्रवासवर्णनं,फोटो पाहिले होते. थ्री ईडियट्स, फुन्सुक वांगडू हे सगळ्यात जवळचे references होते. लेह लडाख माझ्या यादीत होतं पण त्याला adventure trip चं स्वरूप द्यावं असं काही माझं ठरलं नव्हतं.

वयाच्या चाळिसाव्या वर्षी किंवा त्याच्या आसपास कैलासमानसरोवरला जायचं असं खूप वर्ष माझ्या डोक्यात होतं. ते राहिलंय. पण हिमालय मात्र याबाईकराईडच्या निमित्ताने जवळून अनुभवला. 'पाहिला'ऐवजी 'अनुभवला' असं सारखं म्हणत्ये कारण हा खरंच एक अनुभवच आहे.

मी तशी बरी फिरल्ये. नाही असं नाही. भारतात, भारताबाहेर. भारतातले डोंगर नद्या पर्वत समुद्र नैसर्गिक मानवनिर्मित असं थोडंफार. तसंच परदेशातही. युरोपातला निसर्ग, अमेरिकेतली सुबत्ता, आखातात तर माणूस काय काय करू शकतो ह्याचं थक्क करणारं चित्र पाहिलंय. पण निसर्गाचं इतकं आक्रमक, सडेतोड, मती गुंग करणारं रूप मी पहिल्यांदाच पाहिलं. ते रौद्र किंवा भीषण नाहीये. सुंदर आहे. फार सुंदर आहे. पण त्या सौंदर्याचीही भिती वाटते. आपल्या क्षुद्रपणाची फार ढळढळीत जाणिव करून देतो हा इथला निसर्ग, त्याने अस्वस्थ वाटतं. एकप्रकारचा सुन्नपणा येतो. पण हेच अंतिम सत्य आहे हेही मनावर कोरलं जातं. जसा निसर्ग इथे दिसतो तसा खरंच कुठेही दिसत नाही. raw to the core.. awe inspiring.. one has to see it to believe it.. and to see it, one has to go that extra mile..

तर ह्या लडाख रीजनमध्ये पाच दिवस रॉयल एनफ़ील्ड थंडरबर्ड ३५० सीसी ही बाईक स्वत: चालवत फिरण्याचा उद्योग/ आचरटपणा/ शौर्य/ साहस/ कशाला भलतंच काहीतरी, मी का केलं, कारण मला नेहमीचा ठराविक साच्यातला प्रवास करायचा नव्हता. मंजिरी मुळ्ये ही अतिउत्साही मैत्रिण सगळी माहिती घेऊन आली आणि आम्ही तयारीला लागलो. आजपासून पुढचे काही दिवस जमेल तसं ह्याबद्दल लिहिण्याचा विचार आहे. प्रवासवर्णनापेक्षाही basic guidelines असं मी ह्याला म्हणेन. ह्यानंतर जाणार्यांना त्यातून काही फायदा झाला तर उत्तम.

मुग्धा गोडबोले रानडे

अभिनेत्री

Updated : 21 July 2019 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top