Home > रिपोर्ट > मौसमी सिंह.. पुन्हा व्हायरल

मौसमी सिंह.. पुन्हा व्हायरल

मौसमी सिंह.. पुन्हा व्हायरल
X

मॅम, मॅम, तमाम महिला एमपी और मंत्री उन्नाव और कठुआ पर धरना नहीं दिया... स्मृती इराणी यांच्या मागे-मागे माइक घेऊन त्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा हिंदी माध्यमांमधला तो ओळखीचा आवाज. याआधी अनेकदा ही महिला पत्रकार तिच्या बेधडक प्रश्न विचारण्याच्या स्वभावामुळे असेल किंवा लाइव्हच्या आधी लोकांना कसं बोलायचं याचं मार्गदर्शन करताना व्हायरल झालेल्या व्हिडीयोमुळे असेल किंवा 370 कलम हटवल्यानंतर श्रीनगर विमानतळावर सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या झटापटीमुळे असेल सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते. मौसमी सिंह, आजतक वृत्तवाहिनीची राजकीय पत्रकार.

मौसमी सिंह चा स्मृती इराणीला घेरणारा जुना व्हिडीयो आज अचानक व्हायरल झाला. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी स्मृती इराणी यांच्या राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हा व्हिडीयो ट्वीट केला आणि पुन्हा एकदा मौसमी सिंह चर्चेत आली. आजतक साठी काँग्रेस बीट सांभाळणाऱ्या मौसमी सिंह वर अनेकदा भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस समर्थक असल्याचा आरोप ही लावला आहे, मात्र मौसमी न डगमगता नेहमीच पत्रकारिता करत राहिली.

https://twitter.com/rssurjewala/status/1205456231852318720?s=20

वृत्तवाहिनीने जे काम दिलंय ते प्रामाणिकपणे करायचं, लोकांना प्रश्न विचारायचे. मागे हटायचं नाही ही तिची भूमिका. सबरीमाला मंदिरातील कव्हरेज दरम्यान मौसमी आणि तिच्या सहकाऱ्यांवर हल्ला ही झाला होता. त्या ही परिस्थितीत मौसमीने धीराने कव्हरेज केलं होतं. राजकीय कव्हरेज करत असताना पक्षपातीपणाचा आरोप हा होतच राहतो. मात्र पत्रकाराने आपलं काम करत राहायला हवं असं तिचं मत आहे.

Updated : 14 Dec 2019 6:26 AM GMT
Next Story
Share it
Top