Home > रिपोर्ट > शेतकऱ्यांसाठी मंजुळा गावित उद्धव ठाकरेंच्या भेटीला.

शेतकऱ्यांसाठी मंजुळा गावित उद्धव ठाकरेंच्या भेटीला.

शेतकऱ्यांसाठी मंजुळा गावित उद्धव ठाकरेंच्या भेटीला.
X

विधानसभेचा निकाल लागून आज दहा दिवस उलटून गेले तरी देखील सत्ता स्थापना झालेली नाही.

भाजपकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत मंजुळा गावित यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्या निवडून आल्या त्यानंतर त्यांनी आता शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे.

राज्यात परतीच्या पावसाने शेतीला झोडपून काढले. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचलावे यासाठी मंजुळा गावित यांनी बच्चू कडून सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

पिडीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 10 हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुसरीकडे ही मदत अपुरी आहे. शेतकऱ्यांना 25 हजार कोटींची मदत देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, पीडित शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मदत मिळावी अशी मागणी या अपक्ष आमदारांनी केली आहे.

Updated : 3 Nov 2019 4:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top