Home > रिपोर्ट > ममता v/s मोदी... का होतेय राजकारणात मारामारीची भाषा?

ममता v/s मोदी... का होतेय राजकारणात मारामारीची भाषा?

ममता v/s मोदी... का होतेय राजकारणात मारामारीची भाषा?
X

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. या दोघांत चांगलचं शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी येणार याचा अंदाज असल्याने भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालसारख्या राज्याकडे वळवला आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी यांचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोर लावल्याने नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

तृणमूल काँग्रेसवर खंडणीचे पैसे वापरल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्यांच्या या आरोपाबद्दल त्यांना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते असं बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर याप्रकरणावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ममतादीदींनी मला थप्पड मारली तरी मी तो आशीर्वादच समजेन, असं वक्तव्य केलं. एवढंच नाही तर चिटफंडच्या नावाखाली गोरगरीबांच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती तर बरं झालं असतं. आज ममतादीदींना इतकं घाबरावं लागलं नसतं, असं बोलत पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जीवर पलटवार केला होता. त्यावर ममता बॅनर्जी यांनी आता मोदींना उत्तर दिला आहे.

मी तुम्हाला थप्पड मारेन असं कधीही बोलले नव्हते. मी तुम्हाला थप्पड कशाला मारू ? तुम्हाला थप्पड मारली तर माझाच हात मोडेल. मग मी कशाला तुम्हाला थप्पड मारू ? तुम्ही ५६ इंच छातीचा दावा करणारे पंतप्रधान आहात. तुम्हाला थप्पड मारणं तर सोडूनच द्या. साधा स्पर्श करण्याचीही इच्छा नाही असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसंच मोदी आणि अमित शाह हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत. रावण आहेत असाही आरोप बॅनर्जी यांनी केला होता.

Updated : 12 May 2019 7:05 AM GMT
Next Story
Share it
Top