Home > रिपोर्ट > मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी जाणार नाहीत

मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी जाणार नाहीत

मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी जाणार नाहीत
X

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. मोदी हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थितीत राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, पश्चिम बंगालमधील हिंसाचारामध्ये मृत्यु झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना शपथविधीला निमंत्रित केल्यामुळे ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार नाही असं ट्विट च त्यांनी केलंय. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून शपथविधीला न येण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले.

Updated : 30 May 2019 6:40 AM GMT
Next Story
Share it
Top