ममतानींही सुरु केला महिला पॅटर्न...
X
३३ टक्के महिलांना आरक्षण देण्यात यावं ही मागणी गेली अनेक वर्ष जरी प्रलंबित असली तरी आता या मागणीच महत्त्व काही पक्षांनी समजून महिलांचं राजकारणात येणं किती गरजेचं आहे हे त्यांनी घेतलेल्या निर्णयावरुन स्पष्ट होत आहे. नुकतंच बिजू जनता दलचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 33 टक्के महिलांना तिकीट देण्याचे जाहीर केले होते. त्यावर आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत 40.5 टक्के महिलांना तिकीट जाहीर केली आहे. मंगळवारी त्यांनी ही घोषणा केली आहे. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महिलांनी राजकारणात सक्रीय व्हावे यासाठी एकामागोमाग प्रत्येक राज्य एक पाऊल पुढे टाकत आहे. मात्र हेच पाऊल महाराष्ट्र कधी उचलणार हे पाहणे महत्त्वाचे राहील.. जर प्रत्येकांने असा विचार केला तर महिलांचे राज्य यायला वेळ लागणार नाही.