Home > रिपोर्ट > बंगालचा गुजरात होऊ देणार नाही - ममता बॅनर्जी

बंगालचा गुजरात होऊ देणार नाही - ममता बॅनर्जी

बंगालचा गुजरात होऊ देणार नाही - ममता बॅनर्जी
X

केंद्रातल्या सत्ताधारी नेत्यांकडून पश्चिम बंगालचा वारंवार अपमान केला जात आहे. बंगालला आता गुजरात करण्याचा डाव असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला. मी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा आदर करते पण संविधानिक पदाच्या काही मर्यादा असतात ते त्यांनी पार करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाला बॅनर्जी यांनी बंगाल अस्मितेशी जोडत "जर बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर भाजपविरोधात एकत्र या," असे आवाहन त्यांनी केले. मी गुजरातच्या विरोधात नाही, मात्र गुजरातमध्ये दंगल घडवणाऱ्यांच्या विरोधात आहे असं त्यांनी म्हटलंय.

Updated : 12 Jun 2019 8:08 AM GMT
Next Story
Share it
Top