Home > रिपोर्ट > साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत
X

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत स्थान देण्यात आलं आहे. या संरक्षण मंत्रालयाच्या समितीत एकूण २१ सदस्य आहेत.

त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाच्या या समितीचे नेतृत्व्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करून भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विजय झाल्या.

आपल्या बेताल वक्तव्यामुळॆ त्या नेहमी चर्चेत असतात. त्यामुळे प्रज्ञा ठाकूर यांना समितीत घेतल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated : 21 Nov 2019 8:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top