Home > रिपोर्ट > अन्यथा शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा - यशोमती ठाकूर

अन्यथा शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा - यशोमती ठाकूर

अन्यथा शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा - यशोमती ठाकूर
X

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील यावली येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतात पाहणी केली. पावसामुळे तिवसा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले आहे.

यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी पत्रकारांशी बातचीत करताना यशोमती ठाकूर यांनी,"भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री आणि महत्तवाच्या पदांसाठी सध्या सत्तासंघर्ष सुरू आहे. सेना-भाजपने भांडण सोडून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं. अन्यथा सरळ शरद पवारांना मुख्यमंत्री बनवावं, आम्ही काँग्रेसवाले त्यांच्यासोबत जाऊ” असं मत मांडलं आहे. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Updated : 4 Nov 2019 10:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top