Home > रिपोर्ट > पोलाची सामुहिक बलात्कार प्रकरणाचा मुख्यप्रवाहातील माध्यमांना विसर

पोलाची सामुहिक बलात्कार प्रकरणाचा मुख्यप्रवाहातील माध्यमांना विसर

पोलाची सामुहिक बलात्कार प्रकरणाचा मुख्यप्रवाहातील माध्यमांना विसर
X

सोशल मीडियाच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या त्या पीडितेच्या सामुहिक अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूत एक गँग सक्रिय आहे जी महिलांचा लैंगिक छळ करत आहे. तसेच काही अश्लील फोटोशूट करुन तो व्हायरल करु अशा धमक्या देऊन महिलांना ब्लेकमेल करत आहे. आता पर्यंत पोलिसांना सापडलेल्या ४ व्हिडिओतून ही माहिती मिळतेय की चार महिलांसोबत हा प्रकार घडलेला आहे.

वसंत कुमार, सबरीश, सतीश आणि थिरुनावुकारसू या चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे चौघं संबंधित मुलगी आणि तिच्या मित्रांना एका खासगी जागेवर घेऊन गेले आणि त्यांचा लैंगिक छळ केला. त्यानंतर या घटनेचं चित्रीकरण करण्यात आलं. यानंतर ते फुटेज वापरून त्यांनी महिलेला धमकावलं.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलीच्या भावानं पोलाची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरुन आरोपींना अटक केली.

आरोपींवर हे कलम लावले...

वसंत कुमार, सबरीश, सतीश आणि थिरुनावुकारसू या चौघांविरुद्ध 59/19, u/s. 354(A), 354(B), IPC r/w 66(E), IT Act 2000 आणि Tamil Nadu Women Harassment Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पीडितेच्या भावावर हल्ला करण्यात आला असून त्या हल्लेखोरांपैकी एक जण म्हणजे नागराज हा सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाशी संबंधित आहे, यामुळे सत्ताधारी पक्ष या केसमध्ये अडथळा आणत आहे, अशी अनेकांनी टीका केली होती. दरम्यान सोमवारी अण्णा द्रमुकनं निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं की, नागराजला पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.

एकंदरित तामिळनाडूत एवढी मोठी घटना घडली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र या घटनेचं गांभीर्य नसलेल्या मुख्यप्रवाहातील माध्यमांना अद्यापही जाग आलेली दिसत नाहीये.. काही क्वचित माध्यमं दोन दिवसांपासून ही बातमी दाखवत आहे. मात्र मुख्यप्रवाहातील माध्यमांना याचा विसर पडलेला दिसतोय.

Updated : 14 March 2019 3:45 PM IST
Next Story
Share it
Top