Home > रिपोर्ट > महेश मांजरेकरांच्या दत्तक मुलीचं ‘या’ चित्रपटातून लॉंचिंग?

महेश मांजरेकरांच्या दत्तक मुलीचं ‘या’ चित्रपटातून लॉंचिंग?

महेश मांजरेकरांच्या दत्तक मुलीचं ‘या’ चित्रपटातून लॉंचिंग?
X

मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचा मुलगा सत्या मांजरेकर (Satya Manjarekar) याला तुम्ही ओळखतच असाल. सत्याला फन अनलीमीटेड, पोरबाजार आणि जाणिवा या चित्रपटांमधून आपण पाहिलंय. मात्र, महेश मांजरेकर यांची दत्तक मुलगी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तिला चित्रपटातही पाहिलय पण ओळखलं नसेल म्हणुन आपण तीची ओळख करुन घेऊयात.

Courtesy: Social Media

महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘पांघरुण एक विलक्षण प्रेमकहाणी’ च्या प्रोमोमुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलीय. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटातून गौरी मुख्य नायिकेच्या भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कहाणी एका विधवा स्त्रीच्या जीवनावर असून सोबतच गौरीच्या सुंदर नृत्यकलेचीही जोड देण्यात आली आहे.

Gauri-Ingawale-image

Courtesy : Social Mediaअगदी लहान वयात आपल्या कामाचा ठसा सिनेसृष्टीत उमटवणारी गौरी इंगवले ही महेश मांजरेकर यांची दत्तक कन्या आहे. आपल्या वडीलांच्य़ा पावलावर पाऊल ठेवत तीने कुटुंब या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला. जितेंद्र जोशी, वीना जामकर, सिद्धार्थ जाधव आणि मानसी नाईक या कलाकारांसोबत काम केलं. यापुर्वी तीने कलर्स वाहिनीच्या 'चक दुम दुम' या डान्स कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. इथं ती दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. नृत्यासह अभिनयाची आवड असलेली गौरी दीपक भागवत यांच्या ‘3:36 किल्लारी’ या चित्रपटातही झळकली होती.

Updated : 22 Feb 2020 8:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top