Home > रिपोर्ट > केसातील जट कापल्यानं मुलाचा मृत्यू झाला?

केसातील जट कापल्यानं मुलाचा मृत्यू झाला?

केसातील जट कापल्यानं मुलाचा मृत्यू झाला?
X

अस्वच्छतेमुळे तयार झालेल्या केसातील जटेला लोक दैवी शक्तीचं नाव देऊन मोकळं होतात आणि एखाद्या वाईट प्रसंगाशी त्याला जोडून आयूष्यभर त्याचं ओझं आपल्या माथी घेऊन फिरतात. अशाच १३६ महिलांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जटेतून मुक्तता केली आहे. त्यापैकी २२वर्षे जुन्या आणि सर्वात लांब जटेपासून मुक्तता करण्यात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांना यश आले. यादरम्यान आलेला अनुभव नंदीनी जाधव यांना आपल्या फेसबुक पोस्ट मार्फत शेअर केला आहे.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती तर्फे १३६ व्या महिलेची जटेतुन मुक्तता केली आहे. पुणे जिल्हातील, भोर तालुक्यातील वेळु या गावातील ६५ वर्षांच्या शांताबाई भिकु शिंदे यांच्या डोक्यात गेली ४० वर्षापासुन जट तयार झाली होती. एकदा त्यांनी सौदत्ती देवीच्या मंदिरात जट काढली होती पण जट काढल्यानंतर पंधरा दिवसांनी अपघातामध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यु झाला होता. जट कापल्यामुळेच मुलाचा मृत्यु झाला एशी भीती त्यावेळी त्यांना समाजातील लोकांनी भीती घातली होती. त्यामुळे त्याच्या मनात भीती निर्माण झाली होती. पण काही दिवसांनी पुन्हा डोक्यात जट तयार झाली.

गेली २२ वर्षे ही जट डोक्यात वाढत होती. पण एकदा जट काढल्यानंतर घडलेला प्रसंगाच्या भीतीमुळे जट काढायची नाही ठरवले होते. जटेमुळे पाठ, मान, हाताला मुंग्या येणे, कंबर दुखणे, केस धुणे तसेच डोळ्याचा त्रास सुरू झाला. शांताबाई डोळे तपासायाला रामचंद्र कुदळे यांना डोळे दाखवायला गेल्या असता, कुदळे यांनी श्रीमती शांताबाई यांच्या डोक्यातील जट पाहीली. व त्यांना जटेमुळे कसा त्रास होतो. याविषयी माहीती दिली. डोळ्यांचे ऑपरेशन करायचे म्हटले तर जट काढावी लागेल असे शांताबाईना समजावुन सांगितले. कुदळे सर माझ्या बरोबर जट निर्मुलन करताना सहभागी झाले.त्यामुळे शांताबाईना समजावुन सांगण्यास सोपे गेले. त्या जट काढण्यास तयार झाल्यानंतर मला फोन करून सांगितले. त्यानंतर वेळु या गावी येवुन त्यांना जटेविषयी माहीती दिली. त्यांच्या मनात असणारी भीती दुर करून जट निर्मुलन करण्यात आले.

यावेळी महा. अंनिस राज्यप्रधान सचिव, मिलिंद देशमुख, रामचंद्र कुदळे तसेच शांताबाई यांच्या शेजारीच राहणार्‍या मैत्रीणी व कुटुंबाच्या उपस्थितीत शांताबाईचे जट निर्मुलन करण्यात आले. आतापर्यत काढलेल्या जटांमध्ये ही सर्वात लांब जट साडे नऊ फुट लांबीची जट काढण्यात यश आले.

- नंदिनी जाधव

Updated : 5 Nov 2019 9:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top