Home > रिपोर्ट > हिंगणघाट पीडितेची प्रकृती चिंताजनक, आरोपीला आमच्या हवाली करा, संतप्त नागरीकांची मागणी

हिंगणघाट पीडितेची प्रकृती चिंताजनक, आरोपीला आमच्या हवाली करा, संतप्त नागरीकांची मागणी

हिंगणघाट पीडितेची प्रकृती चिंताजनक, आरोपीला आमच्या हवाली करा, संतप्त नागरीकांची मागणी
X

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट शहरात एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेचे संपुर्ण राज्यात पडसाद उमटलेत. घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट शहर आज कडकडीत बंद आहे. या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व संघटना एकत्र आल्यात.

हिंगणघाट शहरातल्या नांदोरी चौकात आरोपी विकेश नगराळे यानं पेट्रोल टाकून या महिला शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न केला. या तरुणीला पेटवून तो घटनास्थळावरुन पसार झाला होता. मात्र वर्धा पोलिसांनी काही तासात आरोपीला नागपूर जिल्हातल्या टाकळघाट परिसरातून अटक केली. थोड्याच वेळात आरोपीला हिंगणघाट सत्र न्यायालयात सादर केलं जाणार आहे.

दरम्यान सर्वच थरातून या घटनेचा निषेध होत आहे. ‘जस्टिस फॉर शी’ म्हणत हिंगणघाट उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर तरुणांनी मोर्चा नेला.या मोर्चात या पिडीतेच्या महाविद्यालयातील सहकारी शिक्षिका आणि विद्यार्थ्यां सहभागी झाले होते. आरोपीला आमच्या हवाली करा, त्याला भरचौकात फाशी द्यावी अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन माग घेण्यात आलं.

आरोपी विकेश नगराळे याने यापुर्वीही या तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही दिवसापुर्वी बसमध्ये आरोपीने या पिडीतेसमोर विष घेण्याचा प्रयत्न केला होता. हिंगणघाट बस स्टेशनमध्ये कित्येकदा आरोपीने या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगताहेत. या मुलीच्या घराच्या आजूबाजूलाही आरोपी विकेश नगराळे कायम चकरा मारायचा.

दरम्यान या महिला शिक्षिकेवर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पिडीत मुलीचे डोळे, नाक ,कान याला गंभीर इजा झाल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

आरोपी आणि पिडीत मुलगी दोघेही हिंगणघाटपासून १४ किलोमीटर असलेल्या दारुडा गावात राहते. ही घटना घडल्यापासून या गावात शांतता पसरली आहे. मात्र गावकरी या घटनेमुळे संतप्त आहेत. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहीजे असं मत दारुडा गावातील महिला व पुरुषांनी मत व्यक्त केलय. या मुलीवर जे बेतलं ते खूप भयानक आहे. असा प्रसंग दुसऱ्या मुलीच्या वाट्याला येवू नये, अस गावकरी म्हणताहेत. समाजाचा महिलाबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तरचं अशा घटना टाळणे शक्य आहे, अस मत गावातील तरुण व्यक्त करताहेत.

Updated : 4 Feb 2020 9:06 AM GMT
Next Story
Share it
Top