Home > रिपोर्ट > 'वंचित'कडे सुशिक्षीत महिलांचा कल वाढतोय - अंजली आंबेडकर

'वंचित'कडे सुशिक्षीत महिलांचा कल वाढतोय - अंजली आंबेडकर

वंचितकडे सुशिक्षीत महिलांचा कल वाढतोय - अंजली आंबेडकर
X

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगले यश मिळाले . आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यावर असताना अशीच कामगिरी विधानसभेत देखील राहील असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केला. . तसेच पक्षाकडे महिलांचा कल वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांनी लोकसभेत पक्षाला दिलेला पाठिंबा महत्त्वपूर्ण आहे, त्यांनी कोणतीच अपेक्षा न ठेवता काम केले तसेच 'वंचित'च्या वाटचालीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर 'वंचित'कडे सुशिक्षीत महिलांचा कल वाढत असून वकील, एमबीए, निवृत्त शिक्षिका वंचितमध्ये येण्यास इच्छूक असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.

Updated : 8 July 2019 9:37 AM GMT
Next Story
Share it
Top