Home > रिपोर्ट > यामुळे होते ऊसतोड महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया

यामुळे होते ऊसतोड महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया

यामुळे होते ऊसतोड महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया
X

बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर महिला गर्भाशय काढून टाकत असल्याचा धक्कादायक प्रकाराला मॅक्समहाराष्ट्र ,बीबीसी मराठी, द हिंदू इत्यादी माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर सर्वत्र या बातमीची खळबळ झाली. वर्षातील सहा महिने ऊसतोड कामगार आपल्या बायका-पोरांसोबत या भागात स्थलांतरित होतात. त्यामुळे ऊसतोड कामगारांचे जिणे या भागातील प्रत्येकाला चांगलेच माहित असते. हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री व काँग्रेस नेते आमदार नितीन राऊत यांनी राज्यभरातील ऊसतोड मजूर महिलांसंबंधीचा हा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडला.

https://twitter.com/ANI/status/1209741048638930944?s=20

बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो महिलांना मासिक पाळीच्यावेळी कष्टाची कामं करता येत नाही. यावर तोडगा म्हणून या महिलांनी गर्भाशय शस्त्रक्रिया करून घेतली आहे.काही दिवसांच्या मजुरीच्या पैशांसाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे, हे अत्यंत दुःखद आहे. असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. चौकशी समितीच्या तपासात काही महिन्यापूर्वी आलेली आकडेवारी १३ हजार ऊसतोड मजूर महिलांनी गर्भाशये काढल्याची माहिती समोर आली होती.

या माहिलांना वर्षांला एक लाख ते दीड लाखापर्यंत मजुरी मिळते, त्यामध्ये खासगी रुग्णालयात गर्भाशये काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च करावे लागतात. अशा महिलांना पुढे शारीरिक त्रास होतो, त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Updated : 25 Dec 2019 10:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top