Home > रिपोर्ट > महाराष्ट्र पोलीस दलातील "ललिता"तल्या "ललित"ची जुळली लग्नगाठ !!!

महाराष्ट्र पोलीस दलातील "ललिता"तल्या "ललित"ची जुळली लग्नगाठ !!!

महाराष्ट्र पोलीस दलातील ललितातल्या ललितची जुळली लग्नगाठ !!!
X

मुलगी म्हणून झालेला जन्म, परंतु शरीरात असलेली मुलगेपणाची जाणीव, त्यामुळे कुटुंबात आणि समाजात होणारी घुसमट यावर मात करून बीडच्या माजलगावमधील ललिताने समाजव्यवस्थेशी संघर्ष गेला, आपल्या हक्कांसाठी न्यायालयातही दाद मागितली आणि आज त्या लढ्याची परिणती म्हणून ती ललित होऊन वावरू लागली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस असलेली ललिताला आता ललित झाल्यानंतर पुरुष पोलीस म्हणून मान्यता तर मिळालीच शिवाय लिंगबदलाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन वर्षात ललित बोहल्यावरसुद्धा चढला आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/1535017729982036/?t=2

दूरच्या नात्यातील सीमाशी ललितची एका लग्नसमारंभात ओळख झाली आणि त्यांचे स्नेहबंध जुळले. ललितने सीमाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि तिने तो आनंदाने स्वीकारला. अर्थात, ललितचा ललितापासून सुरू झालेला सगळा प्रवास सीमाला ज्ञात होता. ललितने आपल्या मूलभूत हक्कांसाठी दिलेल्या लढ्याबद्दल सीमाच्या मनात आदर आहे. "आम्ही एक सर्वसाधारण सुखी दाम्पत्याचा अनुभव घेत पुढचं आयुष्य जगू, असा विश्वास तिने व्यक्त केलाय." ललितही आनंदात आहे. लिंगबदलाची शस्त्रक्रिया आणि पुढचा दोन वर्षांचा उपचारांचा काळ वेदनादायी होता, पण त्यातून झालेला नवा जन्म सुखावह आहे, अशी प्रतिक्रिया ललिताने व्यक्त केलीय.

Updated : 18 Feb 2020 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top