Home > रिपोर्ट > तृतीय पंथीयासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन होणार

तृतीय पंथीयासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन होणार

तृतीय पंथीयासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन होणार
X

महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षा व बालविकासावर भर देण्यासह या अर्थसंकल्पात तृतीयपंथियांच्या स्वतंत्र मंडळासाठी ५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तृतीय पंथीयांच्या विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन होणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

केंद्र सरकारने २००४ मध्ये ‘जेंडर बजेट’ संकल्पना मांडली होती. केंद्र सरकारसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांनीही जेंडर बजेटिंग सेल्स स्थापन केले आहेत. जेंडर बजेटींग सेलचे प्राथमिक कार्य म्हणजे विविध विभागांमध्ये धोरणं आखण्याच्या टप्प्यापासून जेंडर या विषयाबाबत जागरुकता निर्माण करणे व सर्व पातळ्यांवर जेन्डर विषय लक्षात ठेवून नियोजन आणि त्या दृष्टीने कृतीयोजना आखणे हे उद्देश ठेवण्यात आले आहेत.

Updated : 7 March 2020 8:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top