रक्षाबंधनादिवशी पंकजा मुंडेंचं भावूक ट्वीट
Max Woman | 15 Aug 2019 4:46 PM IST
X
X
रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्याइतकेच त्याला ओवाळणेदेखील महत्त्वाचे असते. भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील एक वेगळ्या प्रकारे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'मी अगदी हृदयावर दगड ठेऊन टाळते. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद पोहचले. तुम्ही माझी रक्षा करणार, याचा विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाची रक्षा करणं माझे कर्तव्य आहे. राखी नाही बांधली तरी रक्षा हे बंधन आपल्यात सदैव आहेच,'
असं ट्विट त्यांनी केली आहे.
https://twitter.com/Pankajamunde/status/1161862630677475330?s=20
'आज रक्षाबंधन. मी समजते माझे भाऊ मला खूप प्रेम करतात आणि ते मला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त करतात. पण एकाला राखी बांधून दुसऱ्या भावाला टाळता येणार नाही. मग सर्वांना कसं समजावता येईल?'
https://twitter.com/Pankajamunde/status/1161862618149031936?s=20
असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी आपल्याला साथ दिलेल्या लोकांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाच्या भावनिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे मुंडे यांनी नेमके कोणाला उद्देशून लिहीले आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Updated : 15 Aug 2019 4:46 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire