Home > रिपोर्ट > भाजप नेत्याच्या ‘त्या’ मुस्लिम महिलाविरोधी वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ

भाजप नेत्याच्या ‘त्या’ मुस्लिम महिलाविरोधी वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ

भाजप नेत्याच्या ‘त्या’ मुस्लिम महिलाविरोधी वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ
X

सभागृहात महिला दिनाच्या निमित्ताने विशेष अधिवेशनात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भाषणादरम्यान भाजप आमदार आक्रमक झाले. उत्तरप्रदेशातील भाजपच्या प्रांत अध्यक्षांनी मुस्लिम महिलावर अत्याचार केले पाहीजेत, बलात्कार केले पाहीजेत असं विधान केलं होत. या विधानाचा संदर्भ घेत ही प्रवृत्ती फार वेदनादायक आहे आणि या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महिला बालकल्याण, गृहखाते आणि न्यायसंस्था जोपर्यंत एकत्र काम करत नाही तोपर्यंत महिलांवरील अत्याचार कमी होणार नाही असं ठाम मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

यशोमती ठाकूर यांच्या विधानानंतर भाजप आमदार आक्रमक झाले. माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्तक्षेपानंतर सभागृहातील कामकाज पुन्हा सुरु झाले. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/193079561949194/?t=0

Updated : 5 March 2020 5:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top