Home > रिपोर्ट > नमिता मुंदडा यांना भाजपच्या पहिल्याच यादीत स्थान नाही

नमिता मुंदडा यांना भाजपच्या पहिल्याच यादीत स्थान नाही

नमिता मुंदडा यांना भाजपच्या पहिल्याच यादीत स्थान नाही
X

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बीड जिल्हयातील 5 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यापैकी केज मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी नमीता मुदंडा यांचे नाव पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवार नमीता मुदंडा यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत त्याचं नाव नसल्यानं चर्चेला उधान आलं आहे.

केज च्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचा पत्ता कट झाला आहे. यापूर्वी ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये असा आग्रह पक्षातील कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केला होता. त्यानंतर संगीता ठोंबरे यांची उमेदवारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर रद्द करण्यात आली आहे.

“पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे,” असं म्हणत केजच्या भाजपच्या आमदार संगिता ठोंबरे यांनी उमेदवारी रद्द झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. . मात्र, भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत केज मतदार संघातून कोणालाही उमेदवारी न मिलाल्यानं केज मतदार संघात पुन्हा एकदा चर्चेला उधान आलं आहे.

Updated : 1 Oct 2019 3:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top