Home > रिपोर्ट > राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेचंही ठरलयं...

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेचंही ठरलयं...

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेचंही ठरलयं...
X

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेची चांगलीचं गट्टी जुळली असल्याचं चित्र दिसतयं. पुण्याच्या पर्वती मतदारसंघातील महाआघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेनं जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठिंब्यामध्ये मनसेचे अनिल शिलेदार आणि बाबू वागस्कर हे मोलाची भूमिका बजवात आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं कोथरूड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. याची परतफेड म्हणून, मनसेनं अश्विनी कदम यांना पाठिंबा दिल्याचं म्हंटल जातयं. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेच्या अघोषित आघाडीमुळे मतदार संघातील राजकारण चांगलच रंगात आलं आहे.

पेशाने शिक्षक असलेल्या तसेच उच्चशिक्षीत उमेदवार अश्विनी कदम यांना सर्वच स्तरावरून पाठींबा मिळत असल्याने भाजप उमेदवार माधुरी मिसाळ यांच्यासमोर कडवं आव्हान उभं राहीलयं.

Updated : 14 Oct 2019 10:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top