ठाकरेंची तृप्ती सावंतांना विनंती
Max Woman | 7 Oct 2019 5:19 PM IST
X
X
शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी शिवसेनेविरोधात बंड करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.
“शिवसेनेचं बाळा सावंत यांच्या कुटुंबियांशी भावनिक नातं आहे. हे नातं तोडू नका” अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तृप्ती सांवत यांना केली आहे. तरीदेखील तृप्ती सावंत अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याचं कळतंय.
उद्धव ठाकरे यांच्याशी नीट भेट झाली नाही, भेटीसाठी जास्त वेळ मला मिळाला असता तर मला माझी बाजू मांडता आली असती आणि कदाचित मी उमेदवारी मागे घेण्याचा विचार केला असता, असं तृप्ती सावंत यांनी म्हटलं आहे.
ठाकरे यांनी बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची भावनिक आठवण करून देखील तृप्ती सावंत या त्यांच्या निश्चयावर ठाम असल्याचं दिसून येत आहे.
Updated : 7 Oct 2019 5:19 PM IST
Tags: bjp and shiv sena bjp shiv sena news bjp shiv sena seat sharing bjp shiv sena seats Devendra Fadnavis hindi news latest hindi news maharashtra marathi news shiv sena shiv sena bjp SHIVSENA shivsena foundation day shivsena loksabha list 2019 shivsena-bjp trupti bala sawant trupti sawant
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire