Home > रिपोर्ट > ‘TIK TOK’स्टार सोनाली फोगाट प्रचारादरम्यान संतप्त

‘TIK TOK’स्टार सोनाली फोगाट प्रचारादरम्यान संतप्त

‘TIK TOK’स्टार सोनाली फोगाट प्रचारादरम्यान संतप्त
X

हरियाणातील आदमपूर मतदार संघातून निवडणूकीत उतरलेल्या ‘टिकटॉक’स्टार सोनाली फोगाटने प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागते असं म्हटलं आहे.

मंगळवारी आपल्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान सोनाली फोगाटने “भारत माता की जय” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली परंतू लोकांनी अधिक उत्साह दाखवला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सोनालीनं घोषणा न देणाऱ्या लोकांना पाकिस्तानी असं संबोधलं. “भारतात राहणारे असाल तर भारत माता की, जय बोला” असं संतापलेल्या सोनालीनं म्हंटल.

त्यानंतर पुन्हा दोन वेळा सोनालीनं घोषणा देण्यास सुरवात केली परंतू लोकांनी अपेक्षीत प्रतिसाद दिला नाही. यामुळे रागवलेल्या सोनालीने “आपल्यासारखे लोक भारतात राहतात याची लाज वाटते,” असं म्हंटल.

Updated : 9 Oct 2019 11:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top