Home > रिपोर्ट > दोन्ही हात नसतानाही ‘या’ महिलेनं बजावला मतदानाचा हक्क

दोन्ही हात नसतानाही ‘या’ महिलेनं बजावला मतदानाचा हक्क

दोन्ही हात नसतानाही ‘या’ महिलेनं बजावला मतदानाचा हक्क
X

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. सकाळपासूनच अनेक नेत्यांनी तसेच अभिनेत्यांसह त्यांच्या कुटूंबीयांनी मतदान केले आहे. पुण्यातील पर्वती मतदारसंघात सुरेखा खड्डे यांनी दोन्ही हात नसताना मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोक मतदानाची सुट्टी इतर कामासाठी तसेच फिरायला जाण्यासाठी वापरतात. अशा लोकांचे डोळे उघडण्याचं काम खड्डे यांनी केलं आहे. मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी इतर नागरिकांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

Updated : 21 Oct 2019 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top