Home > रिपोर्ट > ‘भावी आमदार रोहित पवार’- सुप्रिया सुळे

‘भावी आमदार रोहित पवार’- सुप्रिया सुळे

‘भावी आमदार रोहित पवार’- सुप्रिया सुळे
X

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी कर्जतमधील प्रचारासभेसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. ‘सभेदरम्यान शेवटच्या दोन दिवसात रोहितने प्रचार नाही केला तरी चालेल.’ अशा उपरोधिक शब्दांत भाजपला टोला लगावला आहे.

या मतदारसंघातून रोहीत पवार यांना भाजपच्या राम शिंदे यांचं आव्हान आहे. परंतू भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार भाजपचे सहा मंत्री अडचणीत असल्याचं म्हंटल जातयं. यामध्ये राम शिंदे यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे रोहित पवार हेच भावी आमदार असतील हे भाजपनंच कबूल केलं आहे. त्यामुळे “रोहित पवार यांनी आरामात बसलं पाहिजे. २-४ दिवस प्रचार केला नाही तरी चालेल. तुम्ही निवडून येणारचं आहात. हे मी नाही भाजप म्हणतेय,” असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

Updated : 18 Oct 2019 11:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top