Home > रिपोर्ट > शिवसेनेनं तृप्ती सावतांना दाखवला बाहेरचा रस्ता

शिवसेनेनं तृप्ती सावतांना दाखवला बाहेरचा रस्ता

शिवसेनेनं तृप्ती सावतांना दाखवला बाहेरचा रस्ता
X

‘बाळा सावंत यांच्या कुटुंबियांशी शिवसेनेचं भावनिक नातं आहे. हे भावनिक नातं तोडू नका.’ अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी तृप्ती सावंत यांना केली होती. मात्र तरीही तृप्ती सावंत तडजोड करायला तयार नाहीत. भाजपने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आता शिवसेनेतही बंडखोरांवर कारवाई होताना दिसत आहे.

वांद्रे पुर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Updated : 18 Oct 2019 3:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top