Home > रिपोर्ट > खालच्या पातळीचे राजकारण पंकजा ताई करु नका - रुपाली चाकणकर

खालच्या पातळीचे राजकारण पंकजा ताई करु नका - रुपाली चाकणकर

खालच्या पातळीचे राजकारण पंकजा ताई करु नका - रुपाली चाकणकर
X

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातील शेवटच्या टप्यात परळी मतदार संघातील धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईसाठी राज्य महिला आयोगानेही दखल घेऊन कारवाई करणार असल्याची माहीती आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशा अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राहटकर यांना खडे बोल सुनावले आहेत. “धनंजय मुंडे यांना नोटीस पाठवण्यात तुम्ही जितकी तत्परता दाखवली तितकीच तत्परता जर आत्याचार आणि बलात्काराच्या बाबतीत दाखवली असती तर, बर झालं असतं. असं रूपाली चाकणकर यांनी म्हंटल शिवाय त्यांनी पंकजा मुंडे यांना उद्देशून म्हंटल की, “चिक्की घोटाळा करण्याइतकी ही गोष्ट सोप्पी नाही. तेव्हा इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करू नका.”

हेही वाचा...

पंकजा मुंडेंचं राजकारणातून बाहेर जाणं बीडला परवडणारं नाही – प्रितम मुंडे

भाजपमध्ये गेलात म्हणून त्यांचा उदोउदो करू नका – रूपाली चाकणकर

Updated : 20 Oct 2019 2:34 PM GMT
Next Story
Share it
Top